Followers

Friday, 4 May 2018

Sheti tantra

*इस्राईलमध्ये शेती कशी केली जाते ..? वाचून थक्क व्हाल*..

पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे.
इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये उत्पन्न मिळवितो.
पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे.
इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते.
https://www.facebook.com/groups/624030844652704
या साठविलेल्या पाण्यातून देशाची 60 टक्के पाण्याची गरज भागविली जाते.
इस्राईलमध्ये भूगर्भातील पाणीसाठ्याची दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत.
यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे (ऍक्विफर) आणि दुसरा पर्वतीय विभागातील झऱ्यातून पाणीसाठा तयार केला जातो. याशिवाय उत्तरेकडील गोलन टेकड्या व पश्चीमेकडील किनरेट तळ्याजवळ लहान शेकडो झरे आहेत.
समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील झऱ्यातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते. समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते. त्यामुळे ऍक्विफरमध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते. पाणी वापरण्यायोग्य राहत नाही. झऱ्याच्या साठ्यातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून किनरेट तलावात पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून झऱ्यांच्या साठ्यात सोडले जाते. अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्‍च त्या पातळीवर आणणारा इस्राईल
हा जगातील एकमेव देश आहे.

या दोन झऱ्याशिवाय इस्राईलमध्ये भूपृष्ठात पाणीसाठा करण्यासाठी सुमारे 2800 विहिरी असून 150 कूपनलिका आहेत. यामधील काही विहिरी व बोअरवेल्स खास अवर्षणाच्या वेळी उचललेल्या पाण्याचे हिवाळ्यात पुनर्भरण (रिचार्ज ऑफ वॉटर) करण्यासाठी ठेवल्या आहेत. या शिवाय भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. इस्राईलमध्ये हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो

2) किनरेट तलाव (सी ऑफ गॅलीली)
इस्राईलमधील गोड्या पाण्याचा एकमेव आणि मोठा तलाव जॉर्डन नदीवर नैसर्गिक खच दरीतून निर्माण झाला आहे. हा तलाव नैसर्गिकरीत्या खचलेल्या भागात म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा 740 फूट खोलीवर असल्याने जॉर्डन नदीचे पाणी येथे मोठा बंधारा न बांधता साठून राहते. या तलावाची एकूण क्षमता 400 कोटी घनमीटर असून, या तलावातून दरवर्षी 50 कोटी म्हणजे देशाच्या एकूण गरजेच्या 25 टक्के पाणी वापरासाठी घेतले जाते. इस्राईलला वार्षिक सुमारे 200 कोटी घनमीटर पाणी लागते. तलावाचा संपूर्ण साठा वापरावयाचा झाल्यास या तलावाचे
पाणी इस्राईलला दोन वर्षं पुरेल.

तथापि, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी, तसेच पुढील वर्षी कदाचित पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या 25 टक्के पाणी वापरले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी 50 कोटी घनमीटर पाणी उचलून 350 कोटी घनमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. किनरेट तलाव इस्राईलमधील पाण्याचा राखीव साठा आहे. तलावातील मर्यादित पाणी पुरवून कसे वापरावे याचे किनरेट तलाव उत्तम उदाहरण आहे. या तलावाची लांबी 21 किलो मीटर व रुंदी आठ किलोमीटर आहे.

पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे 70 टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते. त्यामुळे देशाची एकूण 15 टक्के गरज भागविली जाते. इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते.

शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा कंपनीस 1000 लिटर पाण्यास दहा रुपये इतका खर्च येतो. शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावयाच्या पाण्यास सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते.

इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात चौपट वाढ झाली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने या गणिताचा जरूर विचार करावा.

इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो. ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे. तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते. शासन पाण्याच्या आवश्यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते. पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने आवश्‍यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे. त्यामुळे शेतीस आवश्‍यक तेवढे पाणी दिले जाते. या देशात पाटाने अजिबात पाणी दिले जात नाही. पण पाणी निश्चितपणे पाहिजे त्या वेळी मिळते. नाहीतर आपणाकडे पाण्याची पाळी 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कशीही लांबते. याचा परिणाम प्रति एकरी उत्पन्नावर होतो.

3) फिल्टरचे तंत्रज्ञान :-
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे.
ठिबक संच बसविण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता व दर्जा कोणत्या प्रकारचा आहे हे विचारात घ्यावे लागते. इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत. पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते. आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो.

4) ड्रीपरचा वापर :-
इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात. पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्यता असते. कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात. याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे. इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते.
त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही.
या तंत्रामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते कारण ग्रीन हाऊसमध्ये पिके वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेतली जातात. पिकाच्या योग्य वाढीकरिता दिवसातून बऱ्याच वेळेला पाण्याचा वापर केला जातो. काही कंपन्यांनी एका वेळी 18 x 18 मीटर एवढ्या अंतरावरील पिकांना पाणी देता येईल असे तुषार संच बनविलेले आहेत. ठिबक सिंचनातून इस्राईलने अतिशय नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. हजारो एकर फळबागा, फुलशेती, स्ट्रॉबेरीची शेती, ठिबक सिंचनावर डोलताना बहरताना दिसून आल्या. एवढेच काय त्यांनी रस्त्यावरील झाडांना, विमानतळावरील हॉटेलसमोरील लहान लहान झाडांनासुद्धा ठिबकनेच पाणी दिले आहे. याउलट आपण ठिबक सिंचनामध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही. कारण आपल्याकडील शेतकऱ्यांना अद्यापही ठिबक पाणी पद्धतीचे महत्त्व पटलेले नाही.

पाणी व्यवस्थापनाच्या फवारा पद्धतीमध्ये कायम स्वरूपी फवारा, फिरता फवारा,
गन फवारा, गन फवारा, कमी दाबाचा फवारा, वैयक्तिक झाडापुरता छोटा फवारा, एका विशिष्ट दिशेने फिरणारा फवारा असे वेगवेगळे प्रकार असून एका वेळी 160 एकरांपर्यंत गोलाकार क्षेत्र फिरून भिजविणारा फवारा सिंचन हे येथील खास वैशिष्ट्य आहे.

मुख्य पाइपवर बसविलेल्या तोट्यांच्या साह्याने पाणी सभोवार पिकावर फवारले जाते. हा फवारा संच शेतात कायमस्वरूपी बसविलेला असतो. मोटारच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने हा संच मागे पुढे पाहिजे त्या प्रमाणे हलविता येतो.
सदरचा संच एका बाजूला स्थिर ठेवलेला असतो व दुसरी बाजू गोलाकार फिरून शेतामधील पिकास फवारा पद्धतीने पाणी दिले जाते. आपल्या राज्यात पाण्याच्या नियोजनाबाबत भरपूर करता येणे शक्य आहे.

इस्राईलच्या गोलन टेकड्या व उत्तरेकडील वातावरण आपल्या महाराष्ट्रातील कोकण विभाग, थंड हवेची ठिकाणे व डोंगरी भागातील वातावरणाशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे. इस्राईलमध्ये उत्तरेकडे पाऊस 700 मि.मी. तर आपल्या या भागात 3000 ते 4000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो.
असे असूनही पावसाळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.

राज्यातील दुष्काळसदृश तालुक्यात वार्षिक 500 ते 600 मि.मी. एवढा पाऊस पडतो. याउलट इस्राईलमध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या विभागात 600 ते 700 मि.मी. पाऊस पडत असूनही केवळ पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या प्रभावी मोहिमेमुळे व पाण्याच्या नियोजनामुळे वर्षभर देशास पाणीपुरवठा करणे त्यांना शक्‍य झाले आहे.

5) संगणक नियंत्रित ठिबक आणि फवारा सिंचन :--
इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे. त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या. त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो.

या संगणकाद्वारे पिकास आवश्यक तेवढेच व आवश्यक वेळी पाणी दिले जाते.
ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे. एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात.

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो. रिमोट कंट्रोल
बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही संस्था इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत.

6) संगणक वापराचे फायदे :--
1) संगणक नियंत्रित पद्धतीत पिकांना पाणीपुरवठा दररोज ठराविक वेळेला व ठराविक कालावधीसाठी पिकाचे त्या दिवशीच्या आवश्‍यकतेनुसार केला जातो.
त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होते.

2) संगणक पिकांना नियमित व अखंडपणे पाणीपुरवठा करत असताना आवश्‍यकतेनुसार व्हॉल्व्ह (झडपा) बंद व चालू करणे इ. कामे करतो.
पिकाचा प्रकार, मातीचे गुणधर्म व त्या दिवशीचे असणारे हवामान, पाण्याची गळती, पाणी वाहण्याची गती, वीजपुरवठा या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आवश्यक तेवढेच पाणी देतो.

3) संगणकामुळे खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिली जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढविता येते. पाणी व खते एकाचवेळी दिल्यास पिकास आवश्‍यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात. पाण्यातून खते देता यावीत यासाठी इस्राईलमध्ये सर्व प्रकारची खते द्रवरूप तयार केली जातात.

4) काही तांत्रिक दोषामुळे जास्त दाबाने पाणी आल्यास व त्यामुळे काही ठिकाणी पाइप फुटून पाणी वाहू लागल्यास संगणकाद्वारे त्या ठिकाणचे व्हॉल्व लगेच बंद केले जातात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.

Saturday, 12 August 2017

पघा थाेड विचार करून

*गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?*
नक्की वाचा..
तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.

दोन तिन दशकांआधी आपल्याकडे *सोयाबीन, कापुस* आलं.
*ज्वारी हळुहळू बाद होत गेली*.
ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला.
कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या.
२०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला.
“खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं.
*गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड”* असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं.
मग गावाबाहेरील गायरानांवर *अतिक्रमण* झालं.

सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.
घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं.
एक आधार असायचा.
बिकट परिस्थितीत लोकं *ज्वारीच्या “कण्या”* खाऊन जगली.
ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.
सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या.
त्यातच *डि.ए.पी*. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली.
एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात *शेणखताची कमतरता* यामुळे जमीनीची *पाणी धारण क्षमता* आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली.
जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून *भूजल* संपुष्टात यायला लागलं.
(सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली.
एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं.
एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने *शेतक-यांच्या आत्महत्या* वाढल्या.
अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.
*त्यातुन लाचारीचा जन्म झाला*.
*लाचारीतुन आत्मसन्मान गेला*.
*आत्मविश्वास गेला*.

*छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.*
ज्यांचे खायचेपण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याच दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला.
गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले. 
*इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला*.
आपल्याच डोळ्यादेखत *२५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊन पटापट गेली*?
इलेक्शन आलं, छटाक भर आकाराचं
*गाव विभागलं, दुभंगल*.
यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे *सबसीडीसाठी* चकरा मारणा-या *लाचार शेतक-याची संख्या* वाढायला लागली.

*दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली*, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या *जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले*;

त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला.
सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं.
*शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं*.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली.
नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले.
त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या.
नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला.
जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं.
नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली.
तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या.
यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
*त्यातच मग सिंचन प्रकल्प आले*.

नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या.
बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली.
त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून *ज्ञानाची पारंपरिक तिजोरी* रिती व्हायला लागली.
अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले.
याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला.
या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, *शेतमालाचे भाव वधारणे*.
हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा.

शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग *बोंब ठोकणार*. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही.
उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले.
परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.

शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.
आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले. 
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.

हे सर्व नियोजन बध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने यातून  आता तरी  बोध घेऊन आपल्याच मुलाबांळाच भवितव्य सुरक्षित करावे*

*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच समोर आपलाच अंधार
नक्की विचार करा.

सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या.
धन्यवाद. 🙏🏻🇮🇳

Thursday, 10 August 2017

Goat farming

: विशिष्ट जातीची करडे, शेळ्या..... ५००,७००......१०००....२००० प्रती किलोने नविन शेळीपालकांना भुलवून विकली जातात, शेळी पालन प्रामुख्याने  मटन साठीच केले जाते, मटनाचा ४०० रुपये किलोचा भाव विचारात घेता मटनसाठी शेळी, बोकड जिवंत प्राणी १५०  ते २२० प्रती कीलो या भावात विकली जातात.  नविन शेळीपालक पाळण्यासाठी घेत राहतील ह्या शेळी पालकांनाही असेच नविन शेळीपालक उफलब्ध होत राहतील तोपर्यतच हे असे तगडे भाव चालतील...आत्ताच नविन शेळीपालकांना आसे महाग भावात शेळ्या बोकड खरेदीदार मिळणे मुष्किल होत आहे... यया बाबीचा विचार करता मटनासाठीचा भाव विचारात घेवून नविन शेळीपालकांनी व्यवसाय सुरु करतांना तशाच भावातील शेळ्या खरेदी करुन व्यवसाय सुरु करावा...असे मत  सार्वत्रिक होत आहे.... काय करावे.... चर्चा करा... जे शेळीपालक अशा तगड्या भावाने विक्री करत आहेत ते या मताशी सहमत होणार नाहित....खुप महाग खरेदी करुन ईमु पालन खरेदी करणारे सीरुवातीचे काही व्यावासायिकांनी पैसे कमावले....पण आता यांची खरेदी बंद झाली.... सर्वाःचा व्यवसाय तोट्यात गेला.. सध्या ईमुपालन बंंद झाले आहे...   बोअर जातीचे वइतर सर्व महाग  जातीचे मटन म्हणून महाराष्ट्रात  कोठेही मटन मिळत नाही....... ...याचा विचार अवश्य करा....
नविन शेळीपालक यांनी महागडी खरेदी करुन व्यवसाय करु नये.. गावठी... परिसरात मिळणाऱ्या शेळ्या खरेदी करुनच व्यवसाय सुरु करावा.... आहार, आरोग्य, व्यवास्थापनावर भर देवून निवड फद्धतीने आपल्या  कळपाचा वंश सुधारणा करावी... उदा. गरिबाघरची मुलगी श्रीमंत घरात लग्न करुन गेली.. गेली दोन्ही वेळचा आहार चांगला, मानसिक तणाव नाही, कष्टाची कामे नाहित..... तर तीची वर्षभरातच तब्येत सुधारते...तीची मुलही सुदृढ जन्माला येतात.......असाच काहिसा विचार करावा...
ईमु पालकांचे आसेच हाल झाले... अनेकांना त्यांना पोसणे कठीण झाले.... खरेदीदार बंद झाले... शेवटी जंगलात सोडून द्यावे लागले.... नविन शेळीपालकांनी बोआर व इतर महाग खरेदी बंद करा....वर्षभरातच ही महाग विक्री बंद होईल.. गुणवत्ता म्हणून ४०० रुपये पर्यत बियाणे म्हणून हरकत  नाही... विचार करा....विचार करा...विचार करा.. .. विविध w app  समुह व प्रशिक्षणात भुलवून १०००,२००० रुपये किलो विक्री केली जाते... या बाबीचा अंत होण्याची ही वेळ आहे... नविन शेळीपालकांनी हजारदा विचार करावा..... मटण विक्री इतकाच विचार करुन निर्णय घ्या...
शेळ्याचा आहार, आरोग्य  याबाबत अनुभवांची देवाण घेवाण करा.... महागड्या विक्रेत्यापासून लांब रहा... फसु नका.... इतरांनाही फसू देवू नका....... आपण फसलात म्हणून ईतरांनाही फसवू नका..
बोअर व इतर महागडे विक्रेते/  विकणारे समुहात गर्दी करुन दिशाभुल करत असतील तर दुर्लक्ष  करा........: हा संदेश विविधा समुहात टाका चर्चा करा... नव्याने या व्यवसायात येणाऱ्या  सदस्यांनी एकत्र  यावे... परस्परांना सहकार्य व मार्गदर्शन करावे...महागडे विकणारे समुह चालवत आहे व नविन बकरे गळास लावत आहेत हे चित्र बदलवा...

Wednesday, 9 August 2017

हवामान

पावसाचा खंड
२० ऑगस्ट२०१७

हवामान विभाग; खरीप संकटात

पुणे (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने पाऊस लांबला आहे. जोरदार पावसासाठी २० अॉगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार असून, हवेचा कमी दाब असलेल्या काही ठिकाणी हलक्या सरी बरसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या खंडामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील खरीप संकटात सापडला आहे.

सध्या अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असल्यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याचे चित्र आहे. अशी स्थिती अजून चार ते पाच दिवस राहील. पंधरा आॅगस्टनंतर ही स्थिती बदलली तर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
- सुनीता देवी, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे.

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब कमी अधिक आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊन असून, काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे हवेत दमटपणा वाढून आर्द्रतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची चिंता लागून असून, पिकेही पाण्यावाचून अखेरची घटका मोजत आहेत. बऱ्याच धरणांतील पाण्यानेही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.

सध्या अरबी समुद्र आणि महाराष्ट्र या भागात १००६ ते १००८ हेप्टापास्कलएवढा हवेचा दाब आहे. उत्तरेकडील हिमालयासह आसाम, उडिसा व बिहार राज्यात हवेचा दाब १००४ हेप्टापास्कलएवढा आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून वारे उत्तरेकडे सरकत आहे. परिणामी राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे राज्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
कोकणाच्या काही भागांत हवेचा दाब कमी आहे. तेथे अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवेचा दाब अधिक असल्याने पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. १४ आणि १५ आॅगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील वाल्पोई, कल्याण, दाडोमार्ग, संगमेश्वर देवरूख येथे सोमवारी (ता. ७) रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच कोयना, लोणावळा, शिरगाव घाटमाथ्यावरही हलक्या सरी कोसळल्या. परंतु मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवेचा दाब १००६ हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली आहे.
विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब कमी होता. त्यामुळे भिवपूर, पवनी, मूळ, नागभिर, उमरेड, आरमोरी, चंद्रपूर, गडचिरोली, चिखलदरा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ८) कोकणातील काही ठिकाणी व घाटमाथ्यावर अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले असून वातावरणात काही प्रमाणात दमटपणा वाढला होता.
-------------
शनिवारपर्यंत हलका पाऊस
कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी शनिवारपर्यंत (ता. १२) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बसतील. आज (बुधवार) कोकणातील अनेक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
---------------
मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटर)
कोकण ः वाल्पोई ५०, कल्याण ४०, दोडामार्ग, संगमेश्वर देवरूख ३०, लांजा, मुंबई, पोलादपूर, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वाडा २०, कानकोण, इला, जव्हार, कणकवली, कर्जत, म्हसाळा, मुल्दे, पणजी (गोवा), पेण, राजापूर, रोहा, सांकेलिम, श्रीवर्धन, वैभववाडी १०.
मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा, गारगोटी १०.
मराठवाडा ः गंगाखेड, लोहा, पालम ३०, आष्टी, बिलोली २०, हिमायतनगर, जिंतूर, मुदखेड, नायगाव, खैरगाव, पाथरी, वाशी १०.
विदर्भ ः भिवपूर १८०, पवनी ११०, मूळ १००, नागभिर, उमरेड ९०, आरमोरी, चंद्रपूर, चिमूर, काटोल, कही ५०, अर्जुनीमोरगाव, ब्रह्मपुरी, लाखंदूर ४०, देसाईगंज, गडचिरोली, हिंगणा, कुरखेडा, मुलचेरा ३०, बल्लारपूर, धानोरा, हिंगणगट, कळमेश्वर, समुद्रपूर, सेलू, वारद २०, भद्रावती, भंडारा, चार्मोशी, चिखलदरा, कामठी, इटापल्ली, लाखानी, मोहाडी, नरखेड, पोम्भूर्णा, शिंदेवाही, सिंरोचा, तुमसर १०.
घाटमाथा ः कोयना (नवजा) ३०, कोयना (पोफळी) २०, लोणावळा (टाटा) शिरगाव, वळवण, डुंगरवाडी १०.