Followers

Sunday, 30 April 2017

*शेतकरी राजा आणि कृषीप्रधान भारत*

*शेतकरी राजा आणि कृषीप्रधान भारत*

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30 - 40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..

बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १० हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० पंधराविसहजार काढुन घेतलं त काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपयं ढापलं त काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फँट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
 म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारवरच्या ईलेक्शन जिंकु.

व्याजानं पैसं देणारा सगळं सोनंनानं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिह्राईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

भाजीमार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी पेडच करु नाही आणि सगळा पैसा घशात घालावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं......

लाईन वाल्या सायबाला वाटते शेतकर्याने विजबिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटनस निघाला तर सर्व शेतकर्यांनी लाख रूपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणी ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिशात घालावे. वर दिवाळीलापण घरोघरी उकळतोच. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

गावगुंडाला वाटतं आपल्यालाही मोकळ्यामोकळ्या१०- १५ हजार मिळवायचं असेल तर करा त्या शेतकऱ्याचा शेतीचा रस्ता बंद, करा खोटानाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे. मरतो का शेतकरी एवढ्यानं

पोलिसाला वाटतं शेतकऱ्यांचे बांधाकोंदावरुन कधी जर लहान सहांन भांडण झालेच तर दोन्ही शेतकर्यांनी मिळुन एजंट, मला व साहेबाला पंचिषेक हजार रूपये द्यावेच. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

कृषी विभागातील सायबांना वाटते शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना म्हणजे आपल्या बापाच्याच् आहेत , त्या विकुनच् खाव्यात. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

खत बियाने दुकानदाराला वाटते बोगस खत बोगस बियाने शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उधार देवुन आपण आपला नफा करून घ्या. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शेतमजुर तर मजुरी देवुन वर दारू ची मागणी करतंय.शेतातला भाजीपाला पाहिजे तेवढा नेतयं आनं नाही म्हणलं तर निघालन काम सोडुन . मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शहरातल्या लोकांना वाटतं शेतमाल भाजीपाला  १०० रूपयात वर्षभर पुरेल एव्हढा द्यावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

TV च्यानल वाल्यांना वाटतं जे शेतकरी म्हणल शेतीत धा लाख उरते अशाच शेतकऱ्यांची मुलाखत दावाव.. आणि उकळावं लाखभर. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

स्वतःला विद्वान् समजणार्यांना टी व्ही सीरियल मध्ये पाहुन वाटते शेतकरी कष्ट करत नाहीत फक्त गावात आलेल्या मास्तरणीच्या मागे फिरतो राणादासारखं

विरोधी पक्षाला वाटते आपली सत्ता आनायची आसल तर शेतकरीच महत्वाचा..

*आणी सरकारला वाटते शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी संपला की देशातील सर्व समस्या संपतील म्हणून पहीले यांना संपवा देश आपोआप सुधारेल...*

टीप :- *अजुन कुणाचे काही राहीले असतील तर हिसाब न देता काढुन घ्या कारण मी शेतकरीराजा आहे आणि माझा देश कृषीप्रधान आहे....* मीच राजा आणि मीच प्रधान मग दोष कुणाला...
लेखक- एक शेतकरीच ...

No comments:

Post a Comment